Skip to content

क्रीडा क्षेत्रातील परिवर्तनाची ताकद – अलिबाग, मुरुड आणि रोहासाठी महत्त्वाकांक्षी ध्येय

::::

“खेळात जग बदलण्याची ताकद आहे.”

– नेल्सन मंडेला

अलिबाग, मुरुड आणि रोहा या तालुक्यांमध्ये अतोनात क्रीडा क्षमता आहे; परंतु अनेक इच्छुक खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही. विविध प्रकारच्या खेळांना आणि खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी मी केलेलं प्रयत्न खालील प्रमाणे.

१. पेझारी गावात दोन बॅडमिंटन कोर्ट बांधले.
२. वेश्वी गावात एक बास्केटबॉल कोर्ट बांधले.
३. नागाव येथील सुसज्ज क्रीडा संकुल ज्यात बास्केटबाल कोर्ट, फुटबॉल मैदान, स्विमिंग पूल, रनिंग ट्रॅक आणि ओपन जीम यांचा समावेश आहे.
४. अलिबागमधील अनेक व्यायामशाळांमध्ये स्थानिक खेळाडूंना मदत करण्यासाठी आवश्यक व्यायामशाळा उपकरणे दिलेली आहेत.
५. शेकडो खेळाडूंना त्यांचा प्रवासखर्च करून, पोषक आहार पुरवून आणि खेळाचे साहित्य आणि जर्सी पुरवून पाठिंबा दिला आहे.
६. ८३ हून अधिक क्रिकेट संघ आणि ७५ कबड्डी संघांनादेखील सामने आयोजित करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.
७. नवगाव येथील व्यायामशाळेस व्यायामाची सर्व उपकरणे दिलेली आहेत.
८. अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील २४ संघांचा सहभाग असलेले PNP चषक हा IPL च्या बरोबरीचा या पाच दिवसीय टेनिस क्रिकेट सामन्यांच्या मालिकेचे यशस्वी आयोजन ज्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.
९. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) T१० या प्रसिध्द क्रिकेट स्पर्धेत अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील स्थानिक क्रिकेटपटूना सहभागी होता याव यासाठी भव्यस्तरावर विनामुल्य नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली.

ध्येय : 
१. सर्वसमावेशक क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे माझे ध्येय आहे.
२. विधानसभेत खेळाडूंच्या गरजा पूर्ण करणे, खेळाडूंसाठी सरकारी योजनांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण स्थानिक खेळांसह विविध खेळांसाठी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.
३.अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील इच्छुक खेळाडूंसाठी विविध पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण व प्रशिक्षण केंद्रासाठी सरकारकडून अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणे.