‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’
- ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुकर व्हावा, प्रवासाची साधनं उपलब्ध नसल्यामुळे किंवा परवडत नसल्यामुळे कुठल्याही मुलीचे शिक्षण अर्धवट राहू नये, या भावनेतून विद्यार्थीनींना १ लाख मोफत सायकल वाटपाचा संकल्प केला. आज जवळपास १५ हजार सायकली वाटपाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर हे ध्येय साध्य होईल, असा विश्वास वाटतो.
२. करोना काळात मोफत धान्यवाटप – मदत नाही कर्तव्य
करोनाच्या आव्हानात्मक काळात घराबाहेर पडता येत नव्हते. ग्रामीण भागात तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते, अन्नधान्य तुडवडा निर्माण झाला होता. अशावेळी अलिबाग – रोहा – मुरुड तालुक्यांत लाखो नागरिकांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले. माझ्या माध्यमातून हजारो लोकांची पोटे या काळात भरू शकली, याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते.
3) असेल दृष्टि तर दिसेल सृष्टी
या उक्तीनुसार शेकापच्या माध्यमातून अनेक गावागावांत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून हजारो गरजूंना मोफत चष्मे वाटप तसेच ज्यांना मोतीबिंदूचा त्रास होता अशा नागरिकांचे मोफत डोळ्यांचे ऑपेरेशन करण्यात आले. त्यांच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येण्याचा हा प्रयत्न अविरत सुरु आहे.
४) करोनाविरुद्ध सज्जता
करोनाचे रुग्ण अगणित वाढत असल्याच्या त्या काळात अनेक हॉस्पिटलला आवश्यक असणारी यंत्रसामुग्री कमी पडू लागली होती. त्यावेळी सामाजिक जबाबदारी म्हणून ही यंत्रसामग्री पुरवून तसेच स्वत: देखील सुसज्ज अद्ययावत अशा करोना सेंटरची उभारणी करून अनेक गरजूंचे प्राण वाचवले.
५) सांस्कृतिक वारसा जपताना
रायगड मधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी शेकाप तसेच माझ्या विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून आपला वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
६) मी होणार स्वावलंबी
आजची महिला केवळ स्वतंत्र होऊन चालणार नाही, तर ती सक्षम आणि स्वावलंबी देखील असायला हवी. याचसाठी या उपक्रमाअंतर्गत अनेक महिलांना मोफत कोर्सेस देऊन शिलाई मशीन प्रशिक्षण व वाटप, ब्युटी पार्लर कोर्स देऊन मेकअप साहित्याचे वाटप तसेच विविध गावातील महिला बचत गटांना कॅटरिंग ( जेवण बनवण्याचे साहित्य ) वाटप करून हजारो महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले.
७) होतकरू हातांना काम
शिक्षणाच्या पूर्तेतेनंतर ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळायला हवे म्हणून अलिबाग – रोहा – मुरुड तालुक्यांत भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून हजारो तरुण तरुणींना रोजगारची संधी उपलबद्ध करून दिली.
८) चक्रीवादळाचा तडाखा सोसताना
रायगड जिल्ह्यातील आपल्या किनारपट्टीच्या भागाला निसर्ग तसेच तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी करून येथील आपद्ग्रस्त नागरिकांना किराणा माल, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.
९) महिलांसाठी रोजगार
आधुनिक काळसोबत चालण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना विविध बचत गटाच्या माध्यमातून कॉम्प्युटर व इतर कोर्सचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला.
१०) हळदी-कुंकू समारंभ
हळदी-कुंकू समारंभ म्हणजे महिलांसाठी घरातील रोजच्या कामांपासून सुट्टी घेऊन मनमुराद आनंद लुटण्याची पर्वणी. या कार्यक्रमांना सुप्रसिद्ध अभिनेत्रींना आमंत्रित करुन येथील महिलांना त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची तसेच आपले कलागुण दाखवून बक्षिसं पटकावण्याची संधी म्हणजे आम्ही दरवर्षी आयोजित करत असलेले हे भव्य हळदी-कुंकू समारंभ!
११) क्रिकेटचे सामने
तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भव्य टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले. यामुळे येथील तरुणांचा आत्मविश्वास दुणावतो, तसेच क्रीडेविषयी त्यांच्या मनात ओढ निर्माण होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या तालुक्यातील खेळाडूंनी हा मानस आहे.
१२) ताईची सावली
आपले हक्काचे पक्के घरकुल असावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र कधीतरी आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. यासाठीच तालुक्यातील घर बांधू इच्छिणाऱ्या कुटुंबांना ताई या नात्याने काही आर्थिक मदत केली.
१३) सक्षम भगिनी अभियान
स्वावलंबी भगिनी घडवण्यासाठी त्यांना प्रेरणादायी व्याख्याने तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या हेतून सुरु केलेल्या या अभियानाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
१४) लेक शिवबाची
समाजातील असुरक्षित वातावरणात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी ठिकठिकाणी महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन केले. संकटकाळात आपल्याला कोणीतरी वाचवायला येईल यापेक्षा आपणच कसे संकटावर मात करू याचे प्रशिक्षण या शिबिरातून मुलींना दिले गेले.