जाहीरनामा
- अलिबाग, मुरुड व रोहा येथे बैलगाडा शर्यतीसाठी ट्रॅक तयार करणार.
- मतदारसंघातील महिला बचत गटांसाठी अद्ययावत सुसज्ज असे बचत गट भवन बनवणार. तसेच, महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करणार.
- संपूर्ण मतदारसंघात ५ ते ६ सुसज्ज क्रिकेटची मैदाने बनवणार.
- सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक क्रीडासंकुल निर्माण करणार.
- जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक मदत पात्र खेळाडूंना करणार.
- चनेरा व मुरुड येथे CBSE बोर्डाच्या शाळा सुरु करणार.
- उच्चशिक्षणाच्या तसेच तंत्रशिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करुन देणार
- अधिकाधिक आजारांवर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असे अद्ययावत इस्पितळ बनवणार.
- गावोगावच्या महिलांचा पाणीप्रश्न सुटावा, यासाठी शासनाच्या पाणी योजना मार्गी लावणार.
- अलिबागमध्ये कलाकारांचे व प्रेक्षकांचे हक्काचे स्थान असलेल्या अशी नाट्यगृहाची पुनर्निमिती करणार
- मतदारसंघातील बाह्य व अंतर्गत रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करणार.
- गरजवंतांसाठी घरकुल योजना राबवणार.
- ज्येष्ठ तसेच गरजवंत कलाकारांना मदतीचा हात देणार.
- भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढा देणार.
स्वप्न तुमचे….. ध्येय माझे….
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या उदात्त विचारांचा पुरस्कार करणारी चौथ्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी, सौ. चित्रलेखा नृपाल पाटील, शेतकरी, कामगार, महिला, बालके आणि संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी, कार्य करण्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अन्न, वस्त्र, निवारा यांच्यासह परवडणारे, दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि वाहतूक या मूलभूत गरजा उपलब्ध करून देऊन समान अधिकार व संधी निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीची भरभराट होईल आणि चांगल्या दर्जाच्या जीवनाचा आनंद लुटता येईल, असा समाज निर्माण करण्याची माझी प्रमुख इच्छा आहे.
२०२४ च्या निवडणुकीत मी नवीन प्रवास सुरू करण्याची तयारी करत असताना, माझ्या लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद गरजेचा आहे. एकत्रितपणे, आपण एक मजबूत, सुशिक्षित समाज तयार करू शकतो, जो प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवतो. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या देशवासियांच्या हक्कांसाठी आणि उन्नतीसाठी अथकपणे काम करण्याची मी आपणास ग्वाही देतआहे. मी तुम्हाला माझ्या या स्वप्नात सामील होण्याचे आवाहन करते. आकांक्षांचे वास्तवात रूपांतर करण्याची आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्याची वेळ आली आहे.
आपली,
सौ. चित्रलेखा नृपाल पाटील (उर्फ चिऊताई)