Skip to content

ताईची सावली - बेघरांसाठी निवारा एक मूलभूत मानवी हक्क

अन्न, वस्त्र आणि निवारा हि प्रत्येक व्यक्तीची मुलभूत गरज आहे. तथापि, हे एक कठोर वास्तव आहे की, प्रत्येकाच्या या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील १.७७ दशलक्ष लोक, देशाच्या लोकसंख्येच्या अंदाजे ०.१५%, बेघर होते. बेघरांची दुर्दशा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. कडक उन्हाळ्यापासून ते हाडं गोठवणारा हिवाळा आणि मुसळधार पाऊस या तीव्र हवामानाच्या परिस्थितीला या व्यक्ती कशा सहन करत असतील यांचे वृद्ध आई-वडील, यांची लहानगी मुलंबाळं कसे सहन करत असतील, याबद्दल विचारदेखील करवत नाही.
या समस्येबद्दलचा उपाय शोधण्यासाठी आणि अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील उपेक्षित समुदायांशी मी चर्चा करुन त्यांच्या समस्या आणि त्यांना माझ्याकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल ऐकून घेतले.
मी माझे सासरे आदरणीय भाई जयंत पाटील आणि माझे पती श्री. नृपाल जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन ‘ताईची सावली’ नावाचा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले. बेघरांसाठी घरे बांधणे आणि खराब झालेल्या बांधकामांच्या देखभालीसाठी आर्थिक सहाय्य करणे हे आमचे उद्दिष्ट होते. सप्टेंबर २०२४ मध्ये हा उपक्रम सुरू झाल्यापासून आम्ही दोन मजबूत घरे यशस्वीरित्या बांधली आहेत आणि अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील आर्थिक १५ कुटुंबांना मदत केली आहे.

ध्येय:
१. दरवर्षी २५ ते ३० घरांना मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.
२. बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती आणि त्यासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यक्तींना मदत करणार आहे.
३. मी बेघरांसाठी अधिक गृहनिर्माण उपक्रम सुरु करण्यासाठी आणि सरकारी योजनांशी संबंधित प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी विधानसभेत आमचा आवाज उठवेन.

 

‘ताईची सावली’ हा उपक्रम बेघरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल याची मलाखात्री आहे.