आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध
::::
” उत्तम आरोग्य ही केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती आहे.”
– जागतिक आरोग्य संघटना.
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या तातडीच्या आरोग्यविषयक आव्हानांना प्रतिसाद म्हणून, मी अलिबागमध्ये अवघ्या दोन आठवड्यांच्या आत ५० खाटांचे पूर्णपणे विनामूल्य सुसज्ज असे देखभाल केंद्र स्थापन केले, ज्यामध्ये पन्नास (५०) खाटा, २३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स, २७ ऑक्सिजन सिलिंडर्स, मोफत औषधे आणि तपासणी, कर्मचारी आणि रुग्णांना PPE किट आणि N95 मास्क, रुग्ण आणि कर्मचार्यांसना मोफत जेवण (नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण), तसेच इतर रूग्णालयातील रूग्णांना आणि इतर लॉकडाऊन प्रभावित ५00 लोकांना दररोज मोफत जेवण, ६00 रुग्णांना यशस्वीरित्या डिस्चार्ज देण, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल रायगडला २ पोर्टेबल व्हेंटिलेटर ज्याचा कोविड१९ पहिल्या लाटेपासून आतापर्यंत हजारो रुग्णांना या व्हेंटिलेटरचा फायदा झाला आहे. अलिबाग, मुरुड, रोहा येथे २00 प्रगत फ्युमिगेशन पंप चे वाटप, ५000 किलो सोडियम हायड्रोक्लोराईटह हे रसायन 200 गावांच्या निर्जंतुकीकरणासाठी दिले, रायगड जिल्ह्यात ४00 N 95 मास्कचे वाटप, ७०० PPE किट फ्रंट लाइन वॉरियर्ससाठी वाटप, अलिबाग, मुरुड, रोहा येथे ४000 हून अधिक अन्नधान्य वाटप , जिल्हा रुग्णालय अलिबागला १५ICU खाटांचे युनिट दिले ज्यात ५ ICU बेड लहान मुलांसाठी आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक उपकरणे, पोर्टेबल एक्स-रे मशीन देखील आहेत. रायगड जिल्ह्यातील मेढेखार, न्हावे, चिंचोटी या आदिवासी गावांमध्ये रुग्णांना त्यांच्या घरातून रुग्णालयात त्वरित उपचारासाठी हलवण्यासाठी ३ रुग्णवाहिका, महाराष्ट्रातील विविध कोविड19 केंद्रांमध्ये 105 खाटा, १६ आधुनिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, ३३ ऑक्सिजन सिलिंडर, १०० ऑक्सिमीटर, ७५ इन्फ्रारेड तापमान तपासणीची उपकणे दिलेली आहेत.
कोविड 19 दरम्यान लसीकरण उपक्रम
१. अलिबाग, मुरुड आणि रोहा येथे १०००० जणांचे मोफत लसीकरण केले.
२. कोविड१९ लसीकरणाबाबत ग्रामीण भागात गैरसमज होते ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम गावकर्यांटमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती सत्र आयोजित केले.
३. लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या गावकर्यांोकरिता मोफत वाहतूक सेवांची व्यवस्था केली.
४. अनेकांकडे स्मार्टफोन नव्हते म्हणून आम्ही त्यांची कोविड१९ पोर्टल वर नोंदानिक्र्ण केले ज्याने त्यांचे लसीकरण सुलभ झाले.
५. या १०००० ग्रामस्थांचे लसीकरण करून प्रत्येकाला २ महिन्यांचे किराणा किट मोफत दिले.
प्रोजेक्ट दृष्टी
अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील जेष्ठ नागरिक, मच्छिमार बांधव, टेलर, भात गिरणी कामगार आणि सर्व महिला ज्यांना बारीक बारीक काम जी अगदी जवळून करायची असतात त्यांना डोळ्यांच्या समस्येमुळे हि काम करताना अनेक अडथळे येतात. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा हि लोक या समस्येवर उपचार घेत नाहीत. परिणामस्वरूप हे छोटे दृष्टी दोष मोतीबिंदुमध्ये बदलतात. परंतु आर्थिक समस्येमुळे हि लोक वेळच्यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करू शकत नाहीत. हि समस्या जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी केलेली उपाययोजना,
१. प्रोजेक्ट दृष्टीच्या माध्यमातून अलिबाग, मुरुड, रोहा या गावांमध्ये अनेक मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली.
२. या शिबिरांमध्ये आम्ही मोफत नेत्रतपासणी करतो, मोफत चष्मा देतो आणि मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करतो.
३. यामध्ये घर ते हॉस्पिटल मोफत वाहतूक, मोफत दुपारचे जेवण, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि एक महिन्याचे वैद्यकीय किट यांचा समावेश आहे.
४. आत्तापर्यंत मी १,00,000 लोकांना चष्म्यांचे मोफत वाटप केले आहे.
५. त्याचप्रमाणे १00 हून अधिक जास्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियादेखील केल्या आहेत.
याव्यतिरिक्त,
१. मी केमोथेरपी, स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया, इतर अनेक शस्त्रक्रिया, अपघात, प्रसूती खर्चासाठी विविध गरजू लोकांच्या वैद्यकीय गरजांसाठी मदत केली.
२. उपचारांसाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जावे लागलेल्या शेकडो रुग्णांना मोफत PNP मेरीटाईम्सची बोट उपलब्ध करून दिली आहे.
मुरुड येथील डायलिसीस सेंटर – अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील रुग्णांना डायलिसीस साठी वाशी किवा मुंबे येथे जवळ-जवळ ३ ते ४ तासांचा प्रवास करुन जावे लागत होते. मी मुरुड येथी संजीवनी आरोग्य केंद्राला मोफत डायलिसीस माशिन दिल्या जेणेकरून आता रुग्णांना डायलिसीस साठी लांब जावे लागत नाही. आत्तापर्यंत ५०० हून अधिक रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे.
ध्येय:
१. अलिबाग, मुरुड आणि रोहा या गावांमध्ये आधुनिक आरोग्य सेवा वाढवण्याचा तसेच आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता आणि सज्जता वाढवणेदेखील आमचे ध्येय आहे.
२. प्रत्येक गावात विविध अनेक आरोग्यविषयक जनजागृती शिबिरे आयोजित करणे जेणेकरून समाजाला आरोग्यविषयक समस्या, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपलब्ध संसाधनांबद्दल शिक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल.
३. प्रत्येक गावात कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करणे. हृदयविकार, लकवा, गरोदर महिला व इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज रूग्णवाहक सेवांची उपलब्धता गंभीर परिस्थितीत जीवनरक्षक ठरेल.
४. खेड्यापाड्यातील लोकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे त्याकरिता प्रत्यके गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी मी सरकारकडे पाठपुरवठा करेन.