शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवण्याचा भक्कम पाया
::::
“शिक्षण हे सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकता.”
– नेल्सन मंडेला.
मा. भाई जयंत प्रभाकर पाटील यांनी विशेषतः दुर्गम भागात – जेथे पूर्वी शैक्षणिक संधी उपलब्ध नव्हत्या, अशा ठिकाणांवर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांसह २८ मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विनामूल्य शाळांची स्थापना करून यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हा वैभवशाली वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने, मी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सचिवपदाची भूमिका स्वीकारली आणि,
१. ग्रामीण भागात CBSE इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्थापना केली.
२. दर्जेदार शिक्षकांची आवश्यकता व महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून, मी बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.ed) कॉलेज सुरु केले.
३. मी संगणक विज्ञानसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले.
४. अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यांतील शाळांच्या विकासात भक्कम इमारतींचे बांधकाम, बेंचेस, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि स्वच्छता सुविधांसह सीसीटीव्ही कॅमेर्यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये अशा अनेकविध सुविधा दिल्या.
५. विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १000 हून अधिक आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांची फी स्वखर्चाने भरली आहे.
ध्येय :
१. अलिबाग, चणेरा, मुरुड आणि त्याच्या आसपासच्या गावांत अद्ययावत CBSE इंग्लिश मीडियम स्कूल्सची स्थापना करणे.
२. गरजवंत शालेय मुलींना सायकलींचे सतत वाटप करणे.
३. अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक देणे.
४. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSE) इच्छुकांसाठी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणे
५. पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणे.
६. विविध कौशल्य विकास केंद्रे स्थापन करणे.
७. शहरी भागात विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालये आणि प्रगत अभ्यासक्रमांची स्थापना करुन या विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण देणे.