Skip to content

 रोजगारनिर्मितीचा महोत्सव

::::

“बेरोजगारीवरील अंतिम उपाय म्हणजे काम आहे,”

कॅल्विन कूलिज.

रोजगार मेळावा : रोजगारनिर्मितीचा महोत्सव
बेरोजगारी ही खरोखरच एक महत्त्वाची समस्या आहे. उद्योजकता आणि विकासाच्या बाबतीत माझे सासरे, मा. भाई जयंत पाटील यांच्या दूरदर्शी प्रयत्नांमुळे रायगडच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे.
१. पीएनपी एज्युकेशन सोसायटी, पीएनपी नाट्यगृह, हॉटेल मॅपल आयव्ही, पीएनपी मेरीटाइम, पीएनपी जेट्टी यांसह विविध उद्योगांच्या स्थापनेद्वारे त्यांनी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
२. आरडीसीसी आणि अर्बन बँकेच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे.
३. आज या उद्योगांमुळे २० हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळत आहे.
४. या कंपन्यांद्वारे निर्माण होणारा थेट रोजगार तसेच हजारो अप्रत्यक्ष नोकर्यां च्या निर्मितीला सहाय्य करुन एक मजबूत इकोसिस्टम विकसित केली आहे.
मी हा वारसा पुढे नेत असताना अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले होते. त्याबद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे,
१. स्थानिक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी १00 हून अधिक नावाजलेल्या कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थां या मेळाव्यासाठी आल्या होत्या.
२. ५० हजारांहून अधिक उमेदवारांनी यात सहभाग घेतला.
३. विशेष म्हणजे, या मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नोकर्याज मिळवून देण्यात आल्या.
४. यामध्ये सर्वाधिक रु. ५० हजारांचे प्रतिमहिना वेतनही काही उमेदवरांना प्राप्त झाले.

 

ध्येय

१. नोकर्यां साठी आवश्यक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची उपलब्धता करून तरुणांना रोजगारासाठी सुसज्ज करणे.
२. अलिबाग, मुरुड आणि रोहा या तालुक्यांना पर्यटन स्थळे म्हणून जाहीर करणे ज्यामुळे पर्यटन आणि संबंधित क्षेत्रात आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
३. अलिबाग, मुरुड आणि रोहा ही किनारी गावे आहेत. मी विधानसभेत मासेमारी क्षेत्रात रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करेन.