आर्थिक स्वातंत्र्य आणि समानतेचा मार्ग
::::
“शिक्षण हे महिलांमध्ये सक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांना आव्हानांना तोंड देण्याचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचे अस्त्र आहे.”
– किर्तिगा रेड्डी.
भारतातील अनेक महिला आजही उपेक्षित आहेत, त्यांना सहसा द्वितीय श्रेणीचे नागरिक मानले जाते. महिलांसाठी आर्थिक स्वायत्तता अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामुळे त्यांना घरगुती जबाबदार्यान सांभाळताना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करता येते. मी सध्या २० हजार हून अधिक महिला बचत गटांबरोबर जोडली गेली आहे. या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना कोणत्याहि प्रकारे त्यांच्या कौटुंबिक जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करायचं नाही. हे ओळखून मी त्याप्रकारचे उपक्रम महिलांसाठी राब्ब्त आहे.
१. मोफत टेलरिंग प्रशिक्षणाद्वारे, शेकडो महिलांना केवळ प्रशिक्षणच नाही तर त्यांना शिलाई मशीनदेखील मिळाली, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करता आला.
२. आमच्या ब्युटीशियन कोर्सेसमध्ये महिलांना ३ महिने प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतः चा रोजगार सुरु करण्यासाठी सर्व साधन सामग्री मोफत दिली जेणेकरून त्या आता स्वतःच ब्युटीपार्लर चालवत आहेत.
३. कॅटरिंग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या बचतगटाना मी योग्यते प्रशिक्षण देऊन व्याव्सायील भांड्यांचा सेट दिला जेणेकरून एकेकाळी १०-१५ हजार रुपये प्रतिमहिना इतके माफक उत्पन्न घेणार्याा महिला आज ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.
४. विधवा भगिनींना त्यांच्या दिवंगत पतीच्या कर्जाची परतफेड करून आणि त्यांचे व्यवसाय परत चालू करण्यास आर्थिक सहाय्य केले आहे.
५. एकेकाळी तुटपुंजे मासिक उत्पन्न मिळवणार्याप महिलांच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली.
ध्येय:
१. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारकडे आणि वैयक्तिक स्तरावर अहोरात्र प्रयत्न करणे.
२. महिलांसाठी विवध कौश्ल्याकेंद्र सुरु करणे.
३. महिलांसाठी विवध अनुदानित योजना सुरू करणे.
४. महिलांमधील साक्षरता दर वाढवणे.