मानवतेचा खरा चेहरा
::::
“आपत्ती, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, नेहमीच जीवन विस्कळीत करतात आणि समुदाय नष्ट करतात”
– लिओन पॅनेटा
अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात तौक्ते (२०२१) व निसर्ग (२०२०) या विध्वंसक चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेले पूर यांनी अपरिमित हानी केली. संपूर्ण घरे उद्ध्वस्त झाली, उपजीविका नष्ट झाली आणि मूलभूत गरजांच्या वस्तूंचा अभाव निर्माण झाला. हि गंभीर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मी केलेले कार्य खालील प्रमाणे,
१. ५0 हजार लोकांना अन्नधान्याचे वाटप केले.
२. ४०५ सौर दिवे, २१00 धान्यांचे किराणाचे किट आणि आवश्यक कपडे दिले.
३. घरांची डागडुजी करण्यासाठी २000 छतांचे पत्रे वितरित केले.
४. १३ आदिवासी समुदायांचे (आदिवासीवाड्या) पुनर्वसन केले.
५. केवनाळे हे गाव संपूर्ण पुनर्वसनासाठी दत्तक घेतले.
६. २५ हजार किलो अन्नधान्याचे वितरण केले.
७. १० हजार लीटर पिण्याचे पाणी आणि १४८०० अन्नधान्याचे वाटप होते.
८. शिवाय, आम्ही २१७ कुटुंबांना आवश्यक भांडी आणि १७६३ व्यक्तींसाठी कपडे दिले.
९. ६५ कुटुंबांना गॅस, स्टोव्ह आणि साफसफाईचे साहित्य वितरण केले.
ध्येय:
१. महाराष्ट्राच्या विधानसभेतील भावी उमेदवार या नात्याने, माझे ध्येय, विशेषत: अलिबाग, मुरुड आणि रोहा या नैसर्गिक आपत्तींपासून असुरक्षित असलेल्या भागातील गरजा पूर्ण करण्यावर केंद्रित आहे.
२. मी नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या पीडितांचे नुकसानभरपाईत भरीव वाढ करण्याची सरकारकडे मागणी करेन.
३. नैसर्गिक आपत्तींविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांच्या आवश्यकतेवर जोर देईन.
४. मी ड्रेनेज सिस्टीम आणि गटारांची नियमित साफसफाई तसेच पूर आणि पाणी साचून राहण्यास त्रास देणारी बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे काम करेन..
५. आपत्तीग्रस्तांसाठी वाढीव भरपाई, प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी आणि कार्यात्मक पायाभूत सुविधांच्या देखभालीद्वारे आपल्या नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे, हे माझे प्राधान्य असेल व त्यासाठी मी विधानसभेत या प्रश्नांवर आवाज उठवेन.