लोकांच्या आरोग्यासाठी वचनबद्धता
::::
“स्वस्थ जीवनशैलीसाठी पाणी आवश्यक आहे,”
– स्टीफन करी
शेतकरी कामगार पक्षाने व पाटील कुटुंबाने या क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेले आहे. पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या लढाईत दिवंगत प्रभाकर पाटील यांनी वडघर पांगलोली येथील पाणीपुरवठ्यात क्रांती घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. जिथे गावकरी एकेकाळी पाणी आणण्यासाठी पाच ते दहा किलोमीटरचा पायी प्रवास करत असत, तिथल्या लोकांना त्यांनी पाणी उपलब्ध करुन दिले.
रोहा येथे असलेला शेणवई चेक डॅम प्रकल्प हा माझा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. माझ्या तांत्रिक टीमच्या सहाय्याने येथील पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत शोधून त्यावर चेक डॅम बांधून, गावातील साठवण टाकी आणि विहिरीमध्ये सातत्यपूर्ण पाणी पोहोचवणारी पाइपलाइन यंत्रणा बसवणे शक्य झाले. परिणामी, अंदाजे २000 ग्रामस्थांना आता वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.
उमटे गाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथील ९६ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे असलेले हे धरण ४० वर्षांहून अधिक काळ स्वच्छ करण्यात आलेले नव्हते. परिणामी, गाळ साचून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. येथील गावक्र्याना गेली अनेक वर्ष अशुद्ध व गढूळ पाणी मिळत होते ज्यामुळे येथील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होते.
परिस्थितीची निकड ओळखून, मी मे २०२४ मध्ये धरणाच्या स्वच्छतेचे मोठे काम हाती घेतले. २५ दिवसांपेक्षा जास्त काळ, ५० हून अधिक जेसीबीच्या ताफ्याने गाळ काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पावसाच्या व्यत्ययामुळे धरणाचा अर्धा भाग स्वच्छ करण्यात आम्हाला यश आले.
ध्येय:
१. संपूर्ण उमटे धरणाची गाळमुक्त करणे.
२. अलिबाग, मुरुड आणि रोहामधल्या सर्व गावांमधील पाण्याची आव्हाने कायमस्वरूपी सोडवणे.
३. पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त चेक बंधारे आणि जलसाठे बांधणे.
४. सर्व तलाव आणि जलस्रोत स्वच्छ करणे व त्यांची पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पुनर्बांधणी करणे.
५. पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पांना चालना देणे.
६. जलसंवर्धनासाठी शाश्व त कार्य करणे.
असले तरी, त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांचा पाणीपुरवठा सुधारण्यात झाला आहे.