Skip to content
Previous slide
Next slide

शेतकरी कामगार पक्ष : कष्टकर्‍यांच्या, वंचितांच्या पाठीशी खंबीर उभा

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा समाजातील शेतकरी, कामगार, महिला आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी लढणारा एक शक्तिशाली राजकीय पक्ष म्हणून नावारुपास आलेला आहे. समाजातील या घटकांकडे होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या शेकापाने सामाजिक न्याय मिळवण्याच्या हेतून अनेक आंदोलने केली, तसेच उपक्रम हाती घेतले. स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर नारायण पाटील आणि विधान परिषदेत उपेक्षित समाजाचा आवाज बुलंद करणारे भाई जयंत प्रभाकर पाटील यांसारख्या मान्यवर नेत्यांचे यात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ग्रामीण भागांतील अनेक वंचित घटकांचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत.

माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच मला हे समजले की, सर्वांगीण सामाजिक विकासाची गुरुकिल्ली व्यक्तींना भेडसावणार्‍या मूलभूत आव्हानांना तोंड देण्यामध्ये आहे. दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, यातून संधीचे मार्ग निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्यांच्या मूळ प्रदेशातून स्थलांतरित न होता त्यांच्या आशा-आकांक्षा साध्य करता येतात. या हेतूने, मी माननीय भाई जयंत पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सुविधांच्या वाढीसाठी पुढाकार घेतला.आज येथील प्रगत अध्यापन पद्धती स्थानिक शाळांमध्ये शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहेत. अलिबागमध्ये CBSE बोर्डाच्या शाळा आणि सुसज्ज B.Ed कॉलेजची स्थापना हा शैक्षणिक प्रगतीसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

विशेषत: विद्यार्थिनींचे शाळेतील गळतीचे उच्च प्रमाण, हे मोठे आव्हान माझ्यासमोर प्राधान्याने उभे आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, आम्ही शालेय विद्यार्थिनींना २५,000 हून अधिक सायकली वाटून एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची सोय तर झालीच; शिवाय गळतीचे प्रमाण लक्षणीय घटण्यासही हातभार लावला. त्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ करून आम्ही या तरुणींना अधिक आत्मविश्‍वासाने आणि स्वतंत्रपणे त्यांचे शिक्षण घेण्यास सक्षम केले आहे.

महिलांच्या शिक्षणाचे उत्तरदायित्व स्वीकारताना…
‘जर एक स्त्री शिक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते’, ही म्हण स्त्रीशिक्षणाचा सामाजिक प्रगतीवर होणारा खोल परिणाम दर्शवते. शेतकरी कामगार पक्षाच्या मी कार्यालयात नोकरी लावण्याची मागणी करायला येणार्‍या असंख्य महिलांच्या आकांक्षा पाहिल्या आहेत. या महिलांना रोजगार करता करताच त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीकडे देखील दुर्लक्ष करायचे नव्हते त्या दृष्टिकोनातून या महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोन्ही पार पाडता येतील अशी कौशल्य विकसित करण्यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले.

त्यांच्यासमोरील आव्हाने ओळखून, मी विशेषत: महिलांसाठी डिझाइन केलेले टेलरिंग, ब्युटीशियन आणि केटरिंग कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले. या कार्यक्रमांनी केवळ आवश्यक कौशल्येच दिली नाहीत, तर उद्योजकतेसाठी व्यावहारिक साधनेही दिली. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, प्रत्येक सहभागीला शिलाई मशीन, ब्युटीशियन किट आणि केटरिंग भांडी यांसारखे साहित्य मिळाले, ज्यामुळे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. परिणाम उल्लेखनीय आहेत; या स्त्रिया आता भरीव उत्पन्न मिळवत आहेत, त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहेत आणि नवीन आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत.

या उपक्रमांतून ज्या यशोगाथा उभ्या राहिल्या आहेत, त्यात कुशल महिला, सुशिक्षित मुली, कुशल खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश आहे. ‘माझ्या ताईची सावली’ योजनेंतर्गत काही बेघर गरजूंना घर मिळाले आहे, तसेच यातील आर्थिक मदतीमुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत. माझे काम सुरू ठेवण्यासाठी या यशोगाथा एक शक्तिशाली प्रेरणा म्हणून काम करतात. या सर्वांमुळे समाजाच्या उन्नतीसाठी माझी बांधिलकी आणखी मजबूत झाली आहे. प्रत्येक यशोगाथा हे सिद्ध करते की, सामाजिक बदलाच्या वाटा शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे मोकळ्या होत आहेत.

सामाजिक हिताचे कार्य करण्यासाठी माझे समर्पण माझ्यात खोलवर रुजलेल्या कौटुंबिक मूल्यांमधून आले आहे. विशेषत: माझे सासरे, मा. भाई जयंत पाटील. वयाच्या ६८ व्या वर्षीही त्यांचे अथक परिश्रम आणि सामाजिक सुधारणेची अढळ दृष्टी यांनी माझ्या प्रवासावर खोलवर प्रभाव टाकला आहे. अन्याय आणि गरिबीने ग्रासलेल्या लोकांसाठी काम करताना येणार्‍या प्रत्येक आव्हानांचा स्वीकार करत त्यांचा वारसा पुढे नेण्याचा माझा निर्धार आहे.

सौचित्रलेखा नृपाल पाटी उर्फ चिऊताई

अधिकृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्ष (महाविकास आघाडी) १९२- अलिबाग विधानसभा मतदार संघ. 

रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप | मा. नगरसेविका, अलिबाग नगरपरिषद

फेसबुक